मला बोलायच नव्हत पण बोलाव लागतय...
काही दिवसांपासून मी पाहतोय
माझा मराठाव्यतरीक्त मित्रपरीवार माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतोय....
कदाचीत त्यांना वाटत असावे की मराठे जातीवाद करत आहेत पण माझ्या भावांनो तस काही नाही....
भावानो सकल मराठा मुक मोर्चाचा तुम्ही अभ्यास करा, कूठे जातीवाद दिसतोय ते सांगा ?
इतर समाजाबद्दल अपशब्द नाहीत,
महापुरुषाचे फोटो किंवा स्टिकर नाहीत,
सार्वजनिक मालमत्तेच नुकसान नाही,
कोणत्याही समाजाविरुद्ध घोषणा नाहीत,
कोणत्याही समाजातील महिलांविरुद्ध अपशब्द नाही..
सर्व काही शांततेत.
यामागचा उद्देश एकच आहे,
संबंध मराठा समाजातील अन्यायाविरुद्धचा लढा तीव्र करण.
मराठा आरक्षण, ऍट्रोसिटी दुरुपयोग संदर्भात कायद्यात सुधारणा करण.
कायदा सर्वांसाठी समान असावा.
येथे कोणत्याही जातीचा, समाजाचा द्वेष केलेला नाही,
प्रत्येक समाजाचा, प्रत्येक व्यक्तीचा आदर करणे हिच आपली संस्कृती आहे,
आम्ही फक्त आमच्या भावना मांडत आहोत,
कसल्याही प्रकारच शक्तीप्रदर्शन आम्ही करत नाही किंवा यातून कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही.
समाजाभिमुख मागण्या शांततेत मांडण्याचा आणि झोपलेल्या मराठा समाजाला अन्याय-अत्याचाराविरुद्ध जाग करण्याचा हा प्रयत्न आहे.
भावांनो कृपया आपल नात हे मित्रत्वाच आहे यात कुशंकांना स्थान नसावे हिच प्रामाणिक इच्छा...
जय जिजाऊ जय शिवराय |
No comments:
Post a Comment